आजच्या काळत आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व काय आहे?| Ajchya kalat aplya jivanat shikshanache mahtwa kay ahe?

आज आपल्याला आपल्या जीवनात शिक्षाणाचे किती महत्व आहे हे जानना फार गरजेचं आहे.हे समजून घेण्या आगोदर आपण आपल्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्प्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो. ही काम सर्वसाधारण व्यक्तीच करते असे नाही तर चांगले व्यक्ती पण अशा प्रकारच्या चुका करतात.

पहिले आपण आपल्या करीअरला महत्त्व द्यायचे आहे कि,आपल्या शिक्षाणाला या प्रश्नाचे उत्तर फार सोपा आहे असा आपल्याला वाटते. आपण लगेच उत्तर देतो की, आपल्याला पहिले आपल्या करीयर बनवायला पाहीजे मग आपल्याला बाकीचे काम वगैरे पाहता येईल असा विचार करतो पण हे साफ चुकीचे आहे, कारण शिक्षण हे केवळ रोजगाराचे माध्यम नसून व्यक्तीच्या मनातील सूप्त गुणांचा अविष्कार करणारा जादू आहे. हे आपण नाही विसरायला पाहिजे, हो ना पण याच गोष्टी कडे दुर्दैवाने आपण दुर्लक्ष करतो.

हे पण वाचा -सूत्रसंचालन कसे करावे?

आज आपल्याला शिक्षण म्हणजे काय आहे?हे पुन्हा एकदा समजून घेण्याची वेळ आलेली आहे, जे आपल्याला शिक्षक चार भींंतीच्या आत शिकवतात तेच नव्हे. शिक्षण केवळ आपल्याला रोजगार कसे प्राप्त करता येईल हेच शिकवित नसून आपण आपल्या सोबतच या संपूर्ण मानव जातीला कमीत कमी वेळात जास्तीत जास्त साधने कसे उबलब्ध करू शकतो हे शिकविते.ज्याच्यात आरोग्य, आर्थिक, औद्योगिक क्रांतीविषयक आणि शैक्षणिक साधने असतील. शिक्षाणाच्या या क्षेत्रांत कसे महत्व आहेत हे आपण विस्ताराने पाहू जेणेकरून आपल्याला समजण्यासाठी आणखी सोईस्कर होईल.

आरोग्य क्षेत्रात शिक्षणाचे महत्त्व /Ayogya kshetrat shikshanache mahtva

मित्रांनो आरोग्य क्षेत्रात शिक्षणाला महत्वाचे स्थान आहे, शिक्षणामुळेच या क्षेत्रात अमुलाग्र बदल घडून येईल. आरोग्याशी संबंधित म्हणजे मेडिकल फिल्ड मध्ये जाऊन आपल्याला बहुत पैसा कमावता येईल. आपल्या सोबतच आपण आपल्या सात पिढीसाठी खूप पैसा कमवू शकतो असं विचार आपल्या मनामध्ये येऊ देऊ नका कारण ही गोष्ट बहुतेक सगळ्यांना माहीती आहे.ही एक रोजगाराचे प्रभावी माध्यम किंवा समाज सेवा ही असू शकते, हे काम करणार्या व्यक्तीवर पुर्णतः अवलंबून आहे.

शाळ, कालेज्या वेळेस जर आपण विध्यार्थ्यांना आरोग्याला किती महत्वाचे स्थान आहे हे जर आपण शिकविले तर आपण आपल्या एक पिढीला वाचविल्या सारखं होईल. आरोग्य व्यक्तीच्या जीवनात अतयंत महत्वाचे भुमिका बजावते.व्यक्ती शारीरिक द्रुष्ट्या सक्षम नसेल तर आपोआप मानसिक द्रुष्ट्या कमजोर होत जाईल. माध्यमिक शाळेत एक आरोग्यविषयक एक विषय असायला पाहिजे नाही तर अशी परिस्थिती देशात किंवा जगामध्ये निर्माण होऊ शकते कि ज्याच्या मुळे संबंधित देशाला किंवा जगाला लाजीरवाणी व्हावी लागेल. डॉक्टारांची संख्या वाढेल पण डॉक्टर स्वतः निरोगी नसतील. त्यांच्या लहानपणी त्याना हे शिकविले कि,कशाप्रकारे पैसा आणि संपत्ती कमावता येईल आणि ऐस आरामीचे जीवन जगता येईल. जर ही परिस्थिती असेल तर आपण एक सक्षम तसेच उत्तम कमाऊ व्यक्ती बनवू शकत नाही.

आजच्या काळत आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व काय आहे? Ajchya kalat aplya jivanat shikshanache mahtwa kay ahe?

पैसे आणि संपत्ती कशाप्रकारे कमवता येईल हे आपण शिकविले याची जाणीव पण व्यक्तीला आहे, पण नुसता कमाविण्याचे मागे लागला हेच विचार आपल्या मना मध्ये बाळगला हा गेल्या वीस-पंचवीस वर्षांपासून चालत आला असेल तर हे काय एका दिवसात बदलणार आहे, नाही ना. हे लोक शारीरिक व मानसिकद्रुष्ट्या निश्चितच सक्षम नसतील. हे लोक कोणत्याही काम अक्यूरेट करू शकत नाही फक्त हे काम करतील पण पाहिजे तसं नाही, हे डॉक्टर का असेना सगळ्यांना हे नियम निश्चितच लागू होईल,कदाचित याचापासून आपलीही सुटका झालेली नसेल.शालेय स्तरापासून हे काम करायला पाहिजे आरोग्याचे महत्व समाजामनामध्ये रूजविण्याचे शिक्षण ही एक प्रभावी माध्यम आहे.याच माध्यामाने आपण एक आपण देशासाठी, जगासाठी एक सक्षम व्यक्ती बनवू शकतो, जो व्यक्ती समाजाचा, देशाचा उद्धार करू शकतो.

आर्थिक क्षेत्रातील शिक्षाणाचे महत्व/Aarthik sketratil shikshanacha mahatva

आर्थिक क्षेत्रात देखील शिक्षणाला अनन्य महत्त्वाचे स्थान आहे. पैसे कोणते मार्गाने कमावायला पाहिजे याची जाणीव राज्यातील प्रत्येक नखगरीकाला असायला हवी. पैसे कमाविण्याचे अनेकोमार्ग पहायला मिळतात पण व्यक्ती कोणत्या मार्गाने कमावायला पाहिजे हे मुलांच्या मनामध्ये बिंबवण्याचे काम शिक्षकाचे आहे. आजच्या काळात नुसता कसे कमावायला पाहिजे हे सागण्यापेक्षा कोणत्या मार्गाने पैसा कमवायला पाहिजे हे शिकविणे फार महत्वाचा आहे.

जर या क्षेत्रात ज्या कलांची आवश्यकता ती आपल्याला शिकविले नाही तर आपण नुसता दुसऱ्या देशाच्यागुणगान करत बसतो यापलिकडे आपल्या हातात कहीपण राहत नाही. समाजात आर्थिक विषमता दूर कारायचं तर प्रत्येक नागरिक जागरूक रहायला पाहिजे.हे काम आपण शिक्षणाचा माध्यमाने निश्चचतपणे लोकांच्या मनामध्ये बिंबवू शकते.आर्थिक विषमता हे देशाचा विकासाला विकासाला बधक होईल.

हे शालेय स्तरापासून विध्यार्थ्यांंच्या मनामध्ये बिंबवण्याचे काम करायला पाहीजे, प्रत्येक काम हे उच्च किंवा नीच नसते. देशाचा विकासासाठी समाजघटका कडून आपल्या श्रम सेवा करने अपेक्षित आहे.कोणताही काम उच्च किंवा नीच नसून हे आपल्या लोकांसाठी म्हणजे देशाचा विकासासाठी केलेली सेवा आहे ,ही गोष्ट विध्यार्थ्याच्यां मनामध्ये पहिले पासून असेल तर देशामध्ये समाजिक विषमता देखील कमी होईल.

आज जीवनातील प्रत्येक गोष्टी जवळपास पैसावरच अवलंबून आहे म्हणून हे पैसा कसे कमवायला पाहिजे हे विध्यार्थ्यांना लहान पणापासून शिकवायला पाहिजे. पैसैचा मागे सारी जग फिरत आहे. तेव्हा या स्पर्धेत आपण पण मागे जायचा नाही. आपण पण अशा गटात सामील झाला पाहीजे ज्या गटात लोक पैसेचा मागे धावणारे आहे

औद्योगिक क्षेत्रात शिक्षाणाचे महत्व

औद्योगिक क्षेत्रात शिक्षणामुळे अमुलाग्र बदल झालेला आहे. जवळपास चौदावा शतकात युरोप खंडामध्ये औद्योगिक क्रांतीला सुरुवात झाला. नंतरच्या काळात आपल्या अतिरिक्त उतपादनाला बाजारपेठ शोधण्यासाठी युरोप खंडातील अनेक देश आशिया-अफ्रिका खंडाकडे रवाना झाले. आपले वसाहती स्थापना केल्या या दर्म्यान इंग्रजांनी अनेक काम केले हे नुसता आपल्या व्यापार कशाप्रकारे वाढवता येईल यासाठीच केले पण यांच्यातील काही कायदाच्या फायदा वसहती मधील लोकांनाही झाला.

20210813 235750 0000

ब्रिटिश लोकांनी जिथ तिथं गेले तिथे आपल्याच फायदासाठीच केले पण याचा संबंधित राज्याला देखील झाला. आता आता हळू हळू शिक्षणाचा प्रसार संपूर्ण जगामध्ये झाला. आच या शिक्षित लोकानी औद्योगिक क्षेत्रात आपले पाय ठेवले नव नवीन यंत्र आणि नियोजन यामुळे औद्योगिक क्रांतीत झपाट्याने वाढ होत असताना दिसते.

आधुनिक काळात औद्योगिक क्षेत्रात कसे काम करायला पाहीजे हे शिकविण्याचे संस्था आहे ज्यच्यातून हजारो लोग आच या क्षेत्रात आले आहेत, हे सर्व काम शिक्षणाचा प्रसारामुळे झालेला आहे.

शिक्षण क्षेत्रात आधुनिक शैक्षणिक साधने आली

शिक्षण क्षेत्रात आधुनिक काळात अनेक नव नवीन शैक्षणिक साधने आलेली आहे.पहिले सारखेअध्यन आणि अध्यापन राहिले नाही. विध्यार्थी आज घरी बसून अध्ययन करू शकतो अशी शैक्षणिक साधने आज उपलब्ध आहेत. शिक्षण क्षेत्रातील अनेक शिक्षण तज्ञांनी देखील याचे स्वागतच केले. आपल्याला परीस्थिती पाहून त्यानुसार बदलावा लागेल ही आपण आपल्या पूर्वांजानपासूनच शिकले आहे.

आधुनिक शिक्षण पद्धती मध्ये आपल्याला काही साधने प्रमुख्याने पहावयास मिळतात-

ऑनलाइन क्लॉसेस

ऑनलाइन क्लॉसेस विध्यार्थी घरी बसूनच अध्ययन करू शकतो, आच या पद्धतीचा वापर थोड्या फार प्रमाणे वापरत आहे,येत्या दोन तीन वर्षात याचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. या पद्धतीचा वापर करून शिक्षक एकच वेळी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिकवू शकतो. याचामुळे वेळेचा बचत होतो.

ट्युशन क्लॉसेस

आज मोठ्या प्रमाणात ट्युशन क्लॉसेस ऑनलाइन पद्धतीनेच शिकवित असतात. याचा वापरामुळे विध्यार्थी आपल्य नोटस पण ऑनलाइनचा वापर करून काढतो आहे, पहिले सारखं आपल्या जलळ पुस्तके न वापरता आपल्या मोबाईल मध्ये एखादा ऑप वापरत आहे जिच्यात सगळे पुस्तके असतील.

अशाप्रकारे आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व असते, आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व किती आहे हे आपण सांगूच शकत नाही, कारण इथं जिथं जे काही आपण नवीन शिकतो हे एक प्रकारचे शिक्षणच आहे. शिक्षाणाचे व्याप्ती फार मोठी आहे. आपल्या जीवनात आपण या अनंत शिक्षण रूपी सागरातून एक थेंब पण पीऊ शकत नाही.

मित्रांनो आजच्या काळत आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व काय आहे? Ajchya kalat aplya jivanat shikshanache mahtwache kay ahe? हा पोस्ट तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना शेयर करा. याच्यात काही कमी असेल, काही सुटला असेल तर कंमेट करून कळवा,मी याच्यात सुधारणा करतो

Share on:
   
           
   
               
           

   

2 thoughts on “आजच्या काळत आपल्या जीवनात शिक्षाणाचे महत्व काय आहे?| Ajchya kalat aplya jivanat shikshanache mahtwa kay ahe?”

Leave a Comment