सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे?|Saglyanchya samor sutra sanchatan kase karawe?

आज आपण सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे? Saglyanchya samor sutra sanchalan kase karawe? या पोस्ट मध्ये सूत्रसंचालन करण्यासाठी आपण सगळ्यात पहिले काय करायला हवे, पहिले पहिले जाऊन कसे बोलायला पाहिजे हे सर्व साध्या भाषेत मी सांगण्याचे प्रयत्न करेन.मित्रांनो हा विषय फारच सोपा आहे, पण लोकांच्या मना मध्ये भीती राहते, विशेषतः ही भीती विध्यार्थ्यांना जास्त राहतो. पण ही गोष्ट थोडा फार प्रयत्नानी सहज साध्य करता येईल.

जर आपल्याला वाटत असेल आपण चांगला सूत्रसंचाक बनू ,तर आपल्याला हा पोस्ट शेवट पर्यंत वाचावे लागेल. असे काही माझे मित्र आहेत अर्ध्यावर सोडून देतात मग बोंबाबोंब करतात याचा काही फायदा झाला नाही त्याच्या काही फायदा झाला नाही म्हणून, फायदा होईल तरी कसा? नीट समजून घेण्याचा प्रयत्न कधी करत नाही. म्हनूनच मी म्हणतो पहिले नीट समजून घ्या मग सर्व काही समजून येईल सूत्रसंचालन का असेना.

सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे? Saglyanchya samor sutra sanchalan kase karawe?

सूत्रसंचालनकसे करावे?याच्यासाठी आपण कसे तयार करू शकतो याचा पेक्षा जास्तीत जास्त लोक याचा नावा वरूनच घाबरतात. जर आपण एखादा विषयला घेऊन एलढा घाबरत असू तर ते आपण करू शकतो याचा उत्तर मुळीच नाही. एखादी गोष्ट आपल्याला शिकायचा असेल तर त्या गोष्टी समजून घेण्याची उत्सुकता हवी आहे भीती नाही.सूत्रसंचालन ही काहीसा असच आहे हे आपण पाहू. याचा अगोदर आपण सूत्रसंचालन म्हणजे काय?हे आपण थोडा फार पाहू.

Visit my blog –www.burlasir.com

सूत्रसंचालन म्हणजे काय? Sutra sanchalan mhanje Kay –

“सूत्रसंचालनही अशी प्रक्रिया असते कि,जी संपूर्ण कार्यक्रमाला एक सूत्रात  बांधते,वेगवेगळ्या कल्पना,विचार एक विशिष्ट शिस्थीच्या निवाच्या धाग्यात गुंफून ठेवतो”कोणत्याही प्रकारचे कार्याक्रम असो त्यात सूत्रसंचालन नसेल तर निश्चितच कार्यक्रम निरस होईल जस एखाद्या भाजीत मीठ नसल्यासारखा होईल.कार्यक्रमचा नाम आला तर तिथे सूत्रसंचालनचा नाव राहील.

सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे?|Saglyanchya samor sutra sanchatan kase karawe?
सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे?

सूत्रसंचालन ही कार्यक्रमातील उणिवा भरून काढण्याचे काम करतो. कार्यक्रमातील पोकळपणा, नीरसता इत्यादी कार्यक्रमाला विघातक असणाऱ्या गोष्टींंपासून दूर ठेवण्याचे काम सूत्रसंचालन करीत असते. वेगवेगळ्या गोष्टीला, वेगवेगळ्या विचाराला एक कार्यक्रम रूपी धाग्याला गूंफूण ठेवण्याचे काम सूत्रसंचालन करीत असते.

सांगायचे झाला तर,सूत्रसंचालनात वेगवेगळ्या गोष्टीला व्यावस्थितपणे मांडण्याचे काम सूत्रसंचालनात केली जाते. कार्याक्रमातील जे बोरींग परीस्थिती राहील ती टाळणे आणि कार्याक्रमाला एक आगळा वेगळा रूप देण्याचे ही करीत असते.

सूत्रसंचालक / Sutrasanchalsk

सूत्रसंचालक हे कार्यक्रमातील शेवट पर्यंत सक्रिय राहणारे एक घटक आहे.अगदी कार्यक्रमाचा सुरुवाती पासून तर शेवट पर्यंत असेल. सूत्रसंचालक म्हणजे केवळ कार्यक्रम पत्रिका वाचणारे नव्हे तर कार्यक्रमाला सूव्यास्थित पार पाडनारे व्यक्ती.कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रम असो सूत्रसंचालक हे अविभाज्य घटक असतो.

सूत्रसंचालनाची पूर्व तयारी /Sutrsanchalanache purvatayari

प्रत्यक्ष सूत्रसंचालन करण्याचे अगोदर आपल्याला याची तयारी करावी लागेल, कारण कोणत्याही काम करण्याचे अगोदर पूर्व तयारी करणे हे कामाचे यशस्वीता मानन्यात येईल. सूत्रसंचालन करण्यासाठी आपल्याला कोणत्या तयारी करावे लागेल हे आपण खालील मुद्द्यांचे आधारे पाहू.

सूत्रसंचालनाचे स्वरूप समजून घ्यावे

सूत्रसंचालन करण्या अगोदर आपल्याला याचे स्वरूप समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे सगळ्यात पहले आपण हे समजून घ्यायला हवे कि,सूत्रसंचालन हे भाषन वगैरे नाही हे एक सूत्रसंचालकाला समजायला पाहीजे. वक्तसारखा भाषने देण्याची मुळीच गरज नाही जर अशा प्रकारे जर संचालक करायला लागला कार्यक्रमाचे रूपरेषाच बदलून जाईल अस होता कामा नाही आहे.

वर्तमान पत्रे नियमित वाचावे

आपल्याला प्रत्येक विषयावरील माहीती हवी असेल तर नियमित पणे वर्तमान पत्रे वाचावे लागेल. संचालन ही अशी आहे कि,जे कोणत्याही विषावर करावा लागेल म्हणूनच आपल्याला ही कामे करावाच लागेल. हे कोणत्याही स्तरातील व्यक्तीला अभ्यासासाठी सहज साध्या करता येणारी साधन आहे. याचासाठी आपल्याला जास्तीत जास्त पैसा खर्च करण्याची मुळीच गरज नाही. कोणत्याही दुकानात, शाळेत व तसेच कोणत्याही पानटपरी वर सहज प्राप्त करता येणारी एक स्वस्त साधन आहे.

वर्तमान पत्रातील जी माहीती आपण वाचतो ती आपण कात्रण करन ठेवायला पाहीजेजेणे करून वेळ प्रसंगी आपण ती योग्य प्रमाणे वापरू शकू.याच्यात एखाद्या महापुरुषांच्या माहीती ही असेल,किंवा एखाद्या सनातन धर्मा बद्दलची विशेष माहीती असेल. वर्तामान पत्रात आपल्याला जे महत्वाचा वाटेल ती माहीती कात्रण करून आपल्या जवळ ठेवावे.

सूत्रसंचालकांचे निरिक्षण करावे

कोणत्याही गोष्ट, काम शिकण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला ती काम कशाप्रकारे यशस्वीरीत्या करता येईल याचा कडे लक्ष द्यावा लागेल. यासाठी आपल्याला ती काम सहजतेने करणारे व्यक्ती आहेत त्यांच्या बारकाईने निरीक्षण करावे लागेल. जे सूत्रसंचालन व्यवस्थित पणे,सहजतेने करतात त्यांच्या आपण जवळून निरीक्षण करायला पाहिजे.

तस आपण प्रत्यक्ष पणे त्यांच्या जवळ जाऊ शकत नाही पण त्यांच्या सूत्रसंचालनाचे निरीक्षण करू शकतो. आपल्या मधील चुका दूर करू शकतो, आपण दुसर्यांचे अनुकरण करायचा नाही पण आपण दुसऱ्यांंकडून आयडिया घेऊ शकतो.

निरीक्षण करण्यासाठी एखाद्या शाळेच्या कार्यक्रम असो, राजकीय स्वरूपाचे असो एवढेच नव्हे तर अगदी टीव्हीवरील कार्यक्रम फक्त आपलयाला कार्यक्रम हवी आहे. ते कशाप्रकारे लोकांना कार्यक्रमात खिळवून ठेवतात तासानतास, हे निरिक्षण करणे आपल्यासाठी महत्वाचे आहे.

पहिले आपल्या ओळखीच्या लोकांनसमोर सूत्रसंचालन करावे

कोणताही काम आपल्याला एखादा पुस्तक वाचून किंवा एक दोन विडोओ बघून ती काम यशस्वीरीत्या करता येईल हे आपल्या दिवा स्वप्न आहे. आपण नुसता वाचून हे काम करू शकतो,हे माझे काम सर्वांना आवडेल हा विचार मनातून काढून टाकावा. ही काम जर व्यवस्थितपणे करायचा असेल तर आपल्याला प्रथम आपल्या ओळखीचे लोकांनसमोर सूत्रसंचालन करावं लागेल.

आपल्या ओळखीचे व्यक्तींंमध्ये आपल्या कुटुंबातील व्यक्ती असेल किंवा आपल्या वर्गातील वर्ग मित्र असतील. कोणीही असो पण आपल्या माणसं असण गरजेचं आहे, जे आपण केलेल्या चुका आपल्या लक्षात आणून देतील.

आपण  आपल्या मनात कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता बोलायला पाहीजे पहिल्या वेळेस चुका होणार आहेत, या बरोबरच काही चांगल्या गोष्टी पण होणार आहेत. आपण ज्यांच्या समोर हे काम करत आहेत ते आपल्याला आपल्या इमानदारीने सांगायला पाहीजे मग त्यानुसार आपल्या मध्ये आपण इंप्रूवमेंट करायला हवा. याच बरोबर काही लहान मोठे कार्यक्रम आपल्या घरी आयोजित केले तर आपण सूत्रसंचालन करावे.

वाढदिवसाच्या कार्यक्रम

आजच्या काळात बहुतेक सगळ्यांच्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रम होत असतात तेव्हा आपण या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करू शकतो.अशा प्रकारच्या आपल्या घरच्या कार्यक्रमातूनच आपण हे आपण शिकू शकतो. एवढेच नव्हे तर आपल्या ओळखींचे लोकांच्या जरी असे लहान सहन कार्यक्रम झाल्या तर आपण पुढे आल्या पाहिजे. हे अगदी लहान स्वरूपाचे कार्यक्रम कार्यक्रम जरी वाटला तरी अशा लहान सहान कार्यक्रमातूनच आपल्याला पहिले शिकायचा आहे.

शाळेतल्या कार्यक्रम

शाळा ही अशी संस्था असते कि,जिच्या माध्यमातून व्यक्ती मानवी जीवनातील सर्वोच्च मूल्ये आत्मासात करते.शाळा ही व्यक्तीला कशाप्रकारे आपल्या जीवन जगायचं आहे याची कला शिकावते. याचावरुन आपल्याला हे समजून येते कि,समाजा मध्ये जर आपल्याला एक सामाजिक प्राणी या नात्याने एक कुशल व्यक्ती बनायाचा असेल तर शाळेच्या आधार आपल्याला घ्यावाच लागेल.

आज आपल्याला शाळेत विद्यार्थी शिकताना दिसतो पण त्यांच्या कडे पाहून अस वाटतं कि,हे नुसता परीक्षेच्या भीतीने वर्गात बसले आहेत.त्यांच्या प्रत्येक हालचालीत अस वाटतं कि,विध्यार्थी पुस्तकी ज्ञानावर एवढे बर दिले कि,आपल्या नैसर्गिक कौशल्य हरवून बसले आहेत.

शाळा ही कला कौशल्याची जननी असल्याने शाळेत प्रत्येक कार्यक्रमात विध्यार्थी सक्रिय सहभाग घेतला पाहिजे आणि निरनिराळ्या कला कौशल्य शिकल्या पाहिजेत. प्रत्येक विध्यार्थ्यांनमध्ये काही सूप्त गुण असतात त्या गुणांचा विकासाला चालना शाळेत मिळाला पाहिजे. जर आपल्या मध्ये सूत्रसंचालन करण्याची कला असेल तर आपण प्रत्येक कार्यक्रमात हिरीरीने सहभाग घ्यायला पाहिजे.

सगळे विध्यार्थी आपलेच आहेत असे समजून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करायला हवे. चुका होत असतात, सगळे आपल्याकडे पाहून विध्यार्थी प्रसंगी हसतात याचाकडे दुर्लक्ष करायला हवे. हे असच चालतो समाजात आज आपल्या कडे पाहून हसणारे उद्याच्या यशाला पाहून आपल्या स्तुती करणार आहेत म्हणून उद्याच्या कामासाठी आजचतयारी करावा लागेल.

सुविचार,सुभाषिते,कविता आणि शेर शायरी पाठ करावे

सूत्रसंचालन करीत असताना आपल्याला प्रत्येक गोष्टीची तयारी करावी लागेल, जर कार्यक्रम शाळेत असेल तर विद्यार्थ्यांना शेर शायरी निश्चितच आवडेल म्हनून त्याना कार्यक्रमात खिळवून ठेवण्यासाठी यांच्या आधार घ्यावा लागेल. सूत्रसंचालक म्हनूनच काही शेर शायरी आपल्याला पाठच करावा लागेल

जर हा पोस्ट सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे?Saglyanchya samor sutra sanchatan kase karawe?  तुम्हाला आवडलाअसेल तर आपल्या मित्रांना शेयर करा. याच्यात काही कमी असेल तर कमेंट करून कळवा मी तसे चुका होऊ देणार नाही.

Share on:
   
           
   
               
           

   

1 thought on “सगळ्यांच्या समोर सूत्रसंचालन कसे करावे?|Saglyanchya samor sutra sanchatan kase karawe?”

Leave a Comment